‘या’ अभिनेत्याला साकारायची होती धोनीची व्यक्तिरेखा,पण सुशांतला देण्यात आली ऑफर

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे मोजकेच लोक असतात. त्यापैकीच सुशांत हा अतिशय हरहुन्नरी कलाकार होता. आधी छोटा पडदा गाजवणारा आणि मग रुपेरी पडद्यावर अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत.
टीम इंडियाचा महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावरील सिनेमात त्याने धोनीची भूमिका साकारली होती. सुशांतचे या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. सिनेमासाठी जेव्हा कास्टिंग करण्यात येत होते तेव्हा खिलाडी अक्षय कुमारला धोनीची भूमिका साकारायची इच्छा होती, त्यामुळे त्यावेळी अक्षय कुमारही या भूमिकेसाठी दिग्दर्शकाच्या डोक्यात होता. पण दिग्दर्शक नीरज पांडेंला धोनी आणि त्याच्या लुकमध्ये बरीच असमानता जाणवली. त्यामुळे त्यांनी अक्षयच्या जागी सुशांतलाच कास्ट करणे पसंत केले.
हे पात्र सुशांतच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले आणि हा पुढे हिट ठरला. 2016 मध्ये सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता. या सिनमाने जवळजवळ 133 कोटींची कमाई केली होती.