रियाच्या घरी छापा टाकणारा अधिकारी आहे ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच या प्रकरणी ड्रग्स कनेक्शन देखील समोर आले. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तपास करत आहे. विशेष म्हणजे एनसीबी टीमचे सुरु असेलेले तापसकार्य आयपीएस अधिकारी समीर वानखेडे करत आहेत. समीर हे मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रीचे पती आहेत.समीर वानखेडे हे मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचे क्रांती रेडकरचे पती आहेत.

२०१७मध्ये समीर आणि क्रांती रेडकर यांनी लग्न केले. त्यावेळी क्रांतीने गुपचूप लग्न उरकले होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला काही खास मंडळींनीच उपस्थिती लावली होती. आता त्यांना जुळी मुले आहेत.  समीर वानखेडे हे २००४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. समीर यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाड टाकली आहे.

त्यामध्ये विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. २०१३ मध्ये जेव्हा मिका सिंगला मुंबई विमानतळावर विदेशी करंसीसोबत पकडण्यात आले तेव्हा देखील समीर यांनी कारवाई केली होती.

 

You might also like