बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नवाजुद्दीनच्या कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती

ठाकरे चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे या आगामी चित्रपटातून त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

‘बोले चुडियाँ’ असं या चित्रपटाचं नाव असून हा एक रोमॅण्टिक ड्रामा चित्रपट असणार आहे. नवाजुद्दीन यामध्ये प्रियकराची भूमिका साकारणार आहे. राजेश भाटिया आणि किरण भाटिया या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

या चित्रपटात नवाजुद्दीनच्या प्रेयसीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. मे महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like