नवाजुद्दीन पिकाला पाणी देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल

लॉकडाउनमुळे सिनेसृष्टीतील सगळी कामं बंद आहेत. त्यामुळे कलाकारांसह सगळेच कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत.  मात्र, नवाजुद्दीननं हाच वेळ शेतीत काम करण्यासाठी दिला आहे. नवाजुद्दीननं पिकाला पाणी देत असतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकिला प्रकाशझोतात राहणं फार आवडत नाही. त्याला गावाकडे वेळ घालवायला आवडतं. मात्र कामामुळे वेळ मिळत नाह. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चित्रपटाचं शुटिंग, तसेच सगळेच कार्यक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे नवाजुद्दीनला भरपूर वेळ मिळाला असून, तो सध्या गावी आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकनं एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात नवाजुद्दीन पिकाला पाणी देताना दिसत आहे. तसंच दिवसभराचं काम संपवलं, असंही म्हटलं आहे.

You might also like