‘हाऊसफुल ४’मध्ये ‘या’ अभिनेत्याची वर्णी

एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला ‘हाऊसफुल ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण चित्रपटाच्या या टीममध्ये आता आणखी एका महत्त्वपूर्ण नावाचा समावेश झाला आहे. या कॉमेडी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस शूटिंगला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील एका गाण्यात तो झळकणार आहे.
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवाजुद्दीन यामध्ये एका बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर नवाजुद्दीन आणि निर्माता साजिद नाडियादवाला एकत्र काम करणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.