‘ठाकरे’साठी नवाजुद्दीन नाही तर ‘हा’अभिनेता होता पहिली पसंती

‘ठाकरे’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन हा पहिली पसंत नव्हता.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी नुकतंच याबाबत खुलासा केला आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इरफान खानचा सर्वात आधी विचार केला गेला होता असं त्याने सांगितलं. पण इरफानच्या तब्येतीमुळे दुसऱ्या अभिनेत्याचा विचार करावा लागला. ‘दिग्दर्शक अभिजीत पानसे, संजय राऊत आणि मी मिळून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी कोणाला निवडावं याचा विचार करत होतो. आम्ही इरफानचा सर्वात आधी विचार केला. पण त्यावेळी इरफानकडेही दुसरे प्रोजेक्ट होते आणि नंतर त्याची तब्येतही खालावली,’ असं तो म्हणाला.

बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य कोणी असेल तर नवाजुद्दीन सिद्दिकी, हे नाव संजय राऊत पहिल्यांदा आम्हाला सुचवलं, असं रोहनने पुढे सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like