एक वेळ अशी आली होती की, आता सगळं संपलं असं वाटलं होतं

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमातील प्रत्येक भागामध्ये नवनवीन पाहुणे भेट देत असतात. काही दिवसापूर्वी ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीमही आली होती. यावेळी अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी आणि संजय राऊत हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले.

या कार्यक्रमादरम्यान नवाजुद्दीनला १२ वर्ष स्ट्रगल करताना कोणत्या अडचणी आल्या असा प्रश्न मकरंद अनासपुरे यांनी विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने करिअर घडवत असताना कराव्या लागलेल्या खडतर प्रवासाचं कथन केलं.‘वॉचमन ते अभिनेता हा प्रवास करताना अनेक अडचण आल्या.१२ वर्ष स्ट्रगल करताना एक वेळ अशी आली होती की, आता सगळं संपलं असं वाटलं होतं’, असं नावाजुद्दीन म्हणाला.

दरम्यान, नवाजुद्दीनने या कार्यक्रमामध्ये करिअरविषयी , चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. नवाजुद्दीनच्या संघर्षाविषयी जाणून घेण्यासाठी २५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वा. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा धमाकेदार भाग नक्की पाहा.

 

You might also like