नवाजुद्दीन -मौनी रॉयच्या ‘बोले चुडिया’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अनेकांना भूरळ घातली आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी लवकरच ‘बोले चुडिया’ या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

मौनी रॉय ‘बोले चुडिया’ या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्धीकी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे. मौनी रॉय या चित्रपटव्यतिरिक्त ‘मेड इन चाइना’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

 

You might also like