‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील कलाकार रुग्णालयात दाखल

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नट्टू काका ही भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांना घशाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. घनश्याम नायक यांच्या रिपोर्टमधून त्यांच्या घशात गाठ झाल्याचं समोर आलं आहे. या गाठीमुळे त्यांना त्रास होत असून अचानक त्यांची प्रकृती बिघडली.

त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच ते लवकर बरे व्हावेत यासाठी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या सगळ्या कलाकारांनी प्रार्थना केल्याचं म्हटलं आहे. तसंच मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसनेदेखील त्यांना मदत केल्याचं सांगण्यात येत आहे.

You might also like