नसिरुद्दीन शाहांनी सुनावले खडबोल

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अभिनेत्री कंगना रणावतवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. नसिरुद्दीन शाह म्हणाले, “समझनेवालों को इशारा काफी होता है, आता सगळेच गप्प आहे. सगळे घाबरलेले आहेत. आता पुढचं वक्‍तव्य ती कुणाविरोधात करेल याचा काही नेम उरलेला नाही.

आपल्या प्रत्येक वक्‍तव्यासोबत तिला बळच येऊ लागलं आहे. असं चालणार नाही. आता ती म्हणतेय, करण जोहरची पद्मश्री काढून घ्या. बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?’, असा थेट सवाल करत त्यांनी खडेबोल सुनाविले.

कंगना रणावतचं नाव न घेता नसिरुद्दीन शाह यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ते म्हणाले, सुशांतवर जर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवाच. त्याची एक प्रोसेस असते. ती सिस्टिम त्यांचं काम करत आहे. अशावेळी प्रत्येकवेळी आपण त्यात पडलंच पाहिजे असं नाही.

कुणाची पद्मश्री काढून घ्यायची आणि कुणाची नाही, हे कोणाला सांगण्याचा अधिकार नाही. उलट आपल्यापैकी एकात तिला तिची जागा दाखवण्याची हिंमत आहे, याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला हवेत, असेही शाह म्हणाले.

दरम्यान, यावर कंगनाचे अद्याप उत्तर आलेले नाही. पण नसिरुद्दीन शाह यांनी पहिल्यांदा टिप्पणी केल्यावर मात्र कंगनाने नसीर यांचे कौतुक केले होते. इतक्‍या महान अभिनेत्याच्या शिव्याही आशीर्वादासारख्या असतात, असे तिच्या टीमने ट्विट केले होते.

You might also like