सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होतं ? सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे

सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतु नाही”, अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडले. त्याचसोबत भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली.

‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’ राम गोपाल वर्माने केली चित्रपटाची घोषणा

त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.आता याच मुद्द्यावरून या प्रकरणाच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.’सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे हे दिसत आहे.

सुशांतची हत्या झाली, पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही,’ असे नारायण राणे म्हणाले.’बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण इथे झाला नाही. 50 दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेलं नाही.

दीपिका पदुकोनच्या आगामी चित्रपटांचा धडाका

जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होतं? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिलंय. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत,’ असेही राणेंनी यावेळी सांगितले.

 

 

You might also like