नाना पाटेकरांकडून राज ठाकरेंचं पुन्हा कौतुक
नाशिक: ‘राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं.’ असा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं.
‘माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केलं. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील.’ असं म्हणत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली.
दरम्यान, अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. ‘स्मारकाच्या माझ्या संकल्पना वेगळ्या असतात, पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे.’ अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला.
पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अशा 100 फुटी कारंजा आणि बॉटिनिकल गार्डनमधल्या लेझर शोसह इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.