‘कोण होणार करोडपती’ शोसाठी नागराज मंजुळे यांनी घेतात इतकं मानधन

सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या शोचं सूत्रसंचालन नागराज मंजुळे करत आहेत आणि या शोला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कोण बनेगा करोडपती या यंदाच्या सीझनसाठी नागराज मंजुळे यांना दोन कोटी रुपये मानधन दिले आहे आणि हा सीझन जवळपास ४५ भागांचा असणार आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कोण बनेगा करोडपती हा शो हिंदीतही असून मराठीपेक्षा हिंदीचं बजेट जास्त असते. त्यामुळे सूत्रसंचालकाच्या बजेटमध्ये देखील मोठी तफावत असते. यासोबतच या शोमधील स्पर्धक जिंकल्यावर मिळणाऱ्या रक्कमेतही मोठा फरक आहे. कौन बनेगा करोडपती शोमध्ये जिंकलेल्या स्पर्धकाला ७ कोटी दिले जातात. तर कोण होणार करोडपतीमधील विनरला एक कोटींचा धनादेश घरी घेऊन जाता येतो.

 

You might also like