‘भाई : व्यक्ती की वल्ली’ उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ गाणं प्रदर्शित

‘भाई -व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ‘नाच रे मोरा’ या गाण्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उत्तरार्धात सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. पुलंचे लहानपण, आई-वडिलांचे संस्कार, भावंडांचे प्रेम, सुनीताबाईंचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश आणि कलाकार म्हणून पुलंचे घडत जाणे हे सगळे खूप सुंदर पद्धतीनं पहिल्या भागात पाहायला मिळाले. आता दुसऱ्या भागात पुलंची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे. पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पु.ल. असा प्रवास उत्तरार्धात पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –