माझी भूमिका केवळ नावापुरती आहे, त्यामुळे मी या चित्रपटासाठी नकार दिला…?

‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता याच चित्रपटाचा सिक्वल येणार असून यामध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या चित्रपटातून साराने काढता पाय घेतल्याचं समोर आलं आहे.

‘सिम्बा’ नंतर सारा ‘लव्ह आज कल २’ चित्रपटात झळकणार होती. मात्र चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

‘लव्ह आज कल २’ च्या माध्यमातून पहिल्यांदाच मला वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र चित्रपटात माझ्या वाट्याला चांगली भूमिका आली असती तर मी नक्कीच या चित्रपटाचा विचार केला असता. या चित्रपटामध्ये माझी भूमिका केवळ नावापुरती आहे, त्यामुळे मी या चित्रपटासाठी माझा नकार दिला आहे, असं साराने एका मुलाखतीत सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like