सुशांतच्या गर्लफ्रेंडला खून व बलात्काराच्या धमक्या, शेअर केला स्क्रिनशॉट

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. १४ जुलै सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नेटक-यांच्या निशाण्यावर आहे. रिया सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांतच सुशांतने आत्महत्या केली. त्यामुळे अनेकजण सुशांतच्या आत्महत्येला रियाला जबाबदार धरत आहेत.मुंबई पोलिसांनीसुध्दा याप्रकरणी तिची कसून चौकशी केली होती.

सुशांतच्या आत्महत्येनंतर आता रियाला तुझ्यावर बलात्कार करु , आत्महत्या कर…नाहीतर तुझा खुन करु अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याचा स्क्रिनशॉट नुकताच तिने शेअर केला आहे.रिया म्हणते, मला गोल्ड डिगर म्हटलं…मला खूनी म्हटलं …मी गप्प राहिले …अनेक आरोप झाले गप्प राहिले…आता माझ्यावर बलात्कार करण्याचा व माझा खून कण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. यासोबतच रियाने पुराव्या दाकल एक स्क्रिनशॉटसुध्दा शेअर केला आहे.

You might also like