मुन्नाभाई एमबीबीएस मधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता!

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील एक अभिनेता गेल्या ३ वर्षापासून बेपत्ता झाला असून त्याच्याविषयी कोणतीही माहिती त्याच्या कुटुंबियांना किंवा चाहत्यांना माहित नसल्याचं समोर आलं आहे.

विशाल ठक्कर हा २०१६ पासून बेपत्ता झाला आहे. विशेष म्हणजे विशालच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. ३१ डिसेंबर २०१५ ला विशाल एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेला होता. घरातून बाहेर पडतांना त्याने आईला सुद्धा आपल्यासोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र आईनेसोबत येण्यास नकार दिल्यामुळे तो एकटा गेला.त्यानंतर त्याच रात्री त्याने वडीलांना मेसेज करुन पार्टीला जात असल्याचं कळवलं. इतकचं नाही तर रात्री १२ वाजता त्याने फेसबुकच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छादेखील दिल्या.

दुसऱ्या दिवशी घरातल्यांनी विशालशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन अचानक बंद असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारानंतर घरातल्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये विशाल १ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११.४५ वाजता घोडबंदर रोड येथे शेवटचा दिसला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची प्रेयसीदेखील होती. प्रेयसीला भेटल्यानंतर तो पुढे शूटसाठी रवाना झाला. मात्र त्यानंतर तो अचानक गायब झाला. या दिवसापासून आजतागायत त्याचा शोध लागलेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like