टप्पूने उडवली बबिताची खिल्ली…..!

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील बबिता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन टप्पू तिची खिल्ली उडवली आहे. तारक मेहतामधील या दोन कलाकारांची अनोखी जुगलबंदी सोशल मीडियावर रंगली आहे.

काय म्हणाला टप्पू  ?

मुनमुनने काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोंमध्ये तिच्या हातात चहाचा कप दिसत आहे. “हा कप रिकामा आहे” अशी गंमतीशीर कॉमेंट या फोटोखाली राजने केली. यावर मुनमुन म्हणाली, “तुला कसं माहिती?” तिच्या या कॉमेंटवर “मी देखील असेच फोटो काढतो.” अशी प्रतिक्रिया राजने दिली. त्यांची ही अनोखी जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला – अक्षय कुमार

You might also like