मुंबई क्राइम ब्रँच करणार ‘या’ दोन अभिनेत्रींची चौकशी

बॉलीवूड अभिनेत्री  प्रियांका चोप्रा  आणि दीपिका पादुकोण आपल्या दमदार अभिनय आणि डान्सचा जलवा दाखवित अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्रींचे भारतासह विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे.तसेच ती सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असल्याने तिची फॉओअर्सची संख्याही खूप मोठी आहे.

त्यातच आता इंस्टाग्रामवर त्यांचे  फॉलोअर्सची संख्या तब्बल कोटींवर गेली आहे. मात्र याच इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या संख्येमुळे सध्या या दोन्ही अभिनेत्रींची मुंबई क्राइम ब्रँचने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

माहितीनुसार मुंबई क्राइम ब्रँचने  फेक सोशल मीडिया फॉलोअर्स स्कॅमबाबतच्या चौकशीमध्ये अभिनेत्री  प्रियांका चोप्रा  आणि दीपिका पादुकोण यांच्यासंदर्भात माहिती  समोर आली  आहे. या दोन्ही अभिनेत्री आणि इतर 10 सेलिब्रिटींचे नाव फेक फॉलोअर्सच्या यादीमध्ये समोर आले आहे.

त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात ही चौकशी होऊ शकते. याप्रकरणी साधारण 150 लोकांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. मुंबई क्राइम ब्रँचने काढलेल्ंया या यादीमध्ये अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि काही अन्य हाय प्रोफाइल व्यक्तींचा समावेश आहे.

You might also like