सरंजामे कुटुंबीयत रंगवणार क्रिकेटचा डाव ; पण या मॅचचा अंपायर मात्र विक्रांत सरंजामेच.

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रत्येकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणारा विक्रांत ख-या अर्थाने व्हिलन असल्याचं समोर आलं आहे. आता प्रेक्षकांना बरेच धक्के बसणार आहेत. येत्या आठवड्यातच ईशाचं एक वेगळं रूप समोर येणार आहे.
ईशालाच राजनंदिनी सिद्ध करण्याचा विक्रांतचा आटापिटा सुरु आहे. त्यामुळेच राजनंदिनीशी जोडली गेलेली प्रत्येक आठवण तो इशावर आजमावत आहे. इशा हीच मागच्या जन्मीची राजनंदिनी आहे हे सिद्ध करणं हाच जणू विक्रांतचा अजेंडा बनला आहे. अशातच इशा सरंजामे कुटुंबियांनी क्रिकेट खेळावं असं सुचवते. एका रविवारी क्रिकेटचा सामना रंगतोही. पण इशा पडल्यावर विक्रांत तिला राजनंदिनी म्हणून हाक मारतो. विक्रांतच्या या वागण्याने सगळेच अचंबित होतात. पुढे काय होतं हे पाहा ‘तुला पाहते रे’च्या २६ तारीखेचा भागात ८.३० वाजता फक्त झी मराठीवर.
https://www.instagram.com/p/BuRlVJahBq9/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या –