चीनमध्ये श्रीदेवींच्या ‘मॉम’ने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

दिवंगत श्रीदेवी यांचा अखेरचा चित्रपट ‘मॉम’ शुक्रवारी चीनमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चीनमध्ये ९.८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  हा चित्रपट चीनमध्ये ३८ हजार ५०० स्क्रीनवर दाखविण्यात आला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

विकेंडच्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. रवी उदयवर दिग्दर्शित या चित्रपटात श्रीदेवी यांनी एका आईची भूमिका साकारली आहे. सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी झटणाऱ्या आणि मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आईची ही कथा आहे.

You might also like