मोहम्मद शमीची पत्नीनं हिमेशच्या गाण्यावर बनवला व्हिडीओ ! नेटकऱ्यांनी विचारला ‘हा’ प्रश्न

गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहतात. आपापल्या आयुष्यात ते सध्या व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून हसीन आपल्या काही व्हिडीओमुळं चर्चेत येत आहे आणि या व्हिडिओमुळे ती ट्रोल सुद्धा होत आहे.

यानंततर हसीन पुन्हा एकदा हुक्का मारतानाच्या व्हिडीओमुळं चर्चेत आली होती आणि तेव्हाही ट्रोल झाली होती. या सगळ्यानंतर आता तिनं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिला भन्नाट प्रश्न विचारला आहे. हसीननं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती हिमेश रेशमिया याच्या एका गाण्यावर अॅक्ट करताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, बॅकग्राऊंडला हिमेशचं तेरी मेरी तेरी मेरी कहाणी हे गाणं सुरू आहे. यावर ती एक्सप्रेशन देत अॅक्टींग करत आहे.

हसीनचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काहींना तो आवडला आहे. परंतु अनेकांना तिचा हा व्हिडीओ खटकल्यानं त्यांनी तिला खोचक प्रश्न केला आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत तिला विचारलं आहे की, तुला शमी भाईची आठवण येतेय का ?हसीनचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

 

You might also like