Dishani chakraborty- दिशानी चक्रवर्तीची बॉलीवूडमध्ये लवकरच एंट्री

दिग्गज अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची कन्या दिशानी लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सध्या दिशानी न्यूयॉर्कमध्ये फिल्म अॅकॅडमीत शिकते आहे. ती सोशल मिडीयावरही बरीच अॅक्टीव्ह आहे. शिक्षण पूर्ण होताच ती बॉलीवूडमध्ये प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
दिशानीची गणना मोस्ट स्टायलीश स्टार डॉटर्समध्ये केली जाते. तिचे वडील मिथून यांनी केवळ अभिनयातच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही चांगले नाव कमावले आहे शिवाय ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 1982 मध्ये त्यांनी अभिनेत्री योगिता बालीशी विवाह केला. त्यांना तीन मुलगे व दिशानी ही एक मुलगी आहे.