मीरा राजपूतचं अजब वक्तव्य, वाचून व्हाल थक्क

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. शाहिदपेक्षा मीरा इन्स्टाग्राम, फेसबुकवर जास्त अॅक्टीव्ह असते. अनेक  वेळा मीरा थ्रोबॅक फोटो किंवा तिच्या कुटुंबासमवेतचे फोटो शेअर करत असते. यात नुकताच तिने शाहिदचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

“शाहिद फक्त चॉकलेट बॉय नाही. जर तुम्हाला खरंच शाहिदचे थ्रोबॅक फोटो पाहायचे असतील तर कॉम्पॅनची जाहिरात पाहा. #complanboy #notachocolateboy”, असं कॅप्शन मीराने या फोटोला दिलं आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शाहिदने अनेक जाहिराती आणि म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. शाहिद आणि मीराने २०१५ मध्ये लग्न केलं असून त्यांन मिशा आणि झैन ही दोन मुलं आहेत.

 

You might also like