मीरा राजपूतने लग्नासाठी ठेवली होती विचित्र अट; जाणून घ्या काय होती नेमकी ही अट

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडच्या गोंडस आणि स्टाइलिश जोडप्यांपैकी एक आहे. 7 जुलै 2015 रोजी दोघांचे लग्न झाले होते. पण मीराने शाहिदशी लग्न करण्यास नकार दिला हे  माहिती असेल वडील पंकज कपूर यांच्यासमवेत शाहिद अनेकदा दिल्लीत त्याच्या गुरुच्या सत्संगात जात होता. सत्संग मध्ये मीराच्या कुटूंबाशी त्यांची भेट झाली दोन्ही कुटुंबांची मैत्री झाल्यानंतर पंकज कपूर यांनी मीराच्या वडिलांना मुलीचा हात शाहिदसाठी मागितला.

शाहिदपेक्षा 12 वर्षांने लहान असल्याने मीराने प्रथमच लग्न करण्यास नकार दिला मात्र बहिणीने समजून सांगितल्यानंतर मीरा लग्नास राजी झाली. पण लग्नाआधी मीराने शाहिदसमोर अट ठेवली होती याचा खुलासा खुद्द शाहिद कपूर यांनी केला आहे.

एका मुलाखतीत शाहिदने सांगितले की लग्नाआधी ठेवलेल्या अटीत मीरा म्हणाली होती की शाहीदला आपले केस पूर्वीप्रमाणेच ठेवावे लागतील तरच ती त्याच्याशी लग्न करेल याशिवाय मीरा म्हणाली की लग्नात शाहिदच्या केसांचा रंग सामान्य राहील.

उडता पंजाब चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळी शाहिदचे केस बरीच वाढले होते पण मीराला शाहिदचे लहान केस असलेला लुक खूप आवडतो. कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा असो शाहिद पत्नी मीरासमवेत सर्वत्र दिसतो.

‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते परंतु….

You might also like