तरुणांनाही लाजवेल असा साजरा केला मिलिंदच्या आईने वाढदिवस

मिलिंद सोमणच्या आईने नेटकऱ्यांना नेहमीच आश्चर्यचकीत केलंय कधी सुनेसोबत लंगडी खेळत, कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या मारतांना त्या दिसून येतात. उषा सोमण यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. मात्र या सेलिब्रेशनमधूनही त्यांनी नेटकऱ्यांना फिटनेसचा संदेश दिला आहे. मिलिंद सोमणने  इन्स्टाग्राम एक व्हिडीओ व फोटो पोस्ट केला आहे. या व्हिडीओत उषा सोमण पुशअप्स करताना दिसत आहेत.

मिलिंदच्या आई ८१  वर्षाच्या आहेत. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. ‘३ जुलै २०२०. लॉकडाउनमध्ये वाढदिवस साजरा केला. १५ पुशअप्स आणि अंकिताने बनवलेल्या केकसोबत पार्टी केली. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

अर्शद वारसीलाही वाढीव वीज बिलाचा फटका….!

You might also like