मिलिंद सोमण झळकणार वेब सीरीजमध्ये

सुपर मॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमण लवकरच प्राइम ओरिजिनल ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेब सीरीजमधून पदार्पण करणार आहे. लग्नानंतर मिलिंदचा हा पहिलाच प्रोजक्ट असून त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याचा दमदार अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
‘फोर मोर शॉट्स प्लीज’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून दर्शकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात शहरातील धावता जीवनातील भावनात्मक प्रवास दाखविण्यात आला आहे. यात मिलिंद हा एका डॉक्टरची भूमिका साकारत आहे. मिलिंदला पहिल्यांदाच अशा भूमिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या सीरीजची लेखिका देविका भगत असून इशिता मोइत्रा यांनी डायलॉग लिहिले आहेत. याचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे.
दरम्यान, ‘फोर मोर शॉट्स प्लीज’मध्ये सयानी गुप्ता, कीर्ति कुलहारी, बानी जे, मानवी गगरू, प्रतीक बब्बर, लिजा रे, मिलिंद सोमण आणि नील भूपालम मुख्य भूमिका साकारत आहे. ही वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –