गायक मिलिंद इंगळेंनी सांगितला कोरोनाचा अनुभव

करोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. या काळात अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच अनेक जण या संकटातून सुखरुप बचावल्याचंही पाहायला मिळालं. त्यातच  प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनादेखील करोनाची लागण झाली होती.

मात्र त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा हा अनुभव शेअर केला आहे.मिलिंद इंगळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत करोनाविरुद्धच्या लढाईचा प्रवास कसा होता हे सांगितलं. दरम्यान, या संकटकाळात खचून न जाता धैर्याने या सगळ्याला सामोरं जाणं गरजेचं आहे हेदेखील त्याने सांगितलं.

 

My Covid 19 experience

Posted by Milind Ingale on Saturday, June 20, 2020

You might also like