मिका सिंहचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी चित्रपट येणार आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंह या चित्रपटाच्यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

आपल्या भारदस्त आवाजामुळे बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा ‘ द मिका सिंह’ या चित्रपटाच्या टायटल  गीताला आवाज देणार आहे. तर चित्रपटाच्या टायटल गीताला मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱ्या अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे.

उत्तुंग ठाकूर गाण्याला जरा वेगळा आणि मराठीमध्ये कधीही न ऐकलेला असा आवाज हवा होता.म्हणून त्यांनी अमितराज यांना मिका सिंहचे नाव सुचवल्यानंतर जास्त वेळ न दवडता अमितराज यांनी देखील या नावाला पसंती दर्शवली. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –