मयुरी देशमुखच्या पतीची राहत्या घरात आत्महत्या

मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे याने नांदेडमधील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आशुतोष हा ३२ वर्षांचा होता. आशुतोषने गळफास लावून स्वत:चे आयुष्य संपवले. या घटनेमुळे आशुतोषच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषने हे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भात कोणताही माहिती समोर आलेली नाही. आशुतोषच्या हत्येचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येसंदर्भातील एक व्हिडिओही आपल्या फेसबुक प्रोफाइलवरुन पोस्ट केला होता.

तक्रार दाखल होताच रिया मुंबईतून नौ दो ग्यारा 

यामध्ये त्याने माणूस आत्महत्या का करतो यासंदर्भात आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये आशुतोषनेच असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस सध्या या व्हिडिओचा आशुतोषच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का या दृष्टीनेही तपास करत आहेत. ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

‘केजीएफ चॅप्टर – २’ मधील संजयचा लूक आला समोर

लॉकडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. आशुतोषची आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आलं. आशुतोष आणि मयुरीमध्ये कोणतेही मतभेद नव्हते असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटलं आहे. असे असतानाही आशुतोषने आत्महत्या का केली यामागील गूढ अद्याप कायम आहे.

 

You might also like