‘मराठी बिग बॉस-2’ च्या घरामध्ये मयुरी देशमुखची एन्ट्री ?

छोट्या पडद्यावरील मराठी ‘बिग बॉस पर्व -2’ हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. तसेच यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी चेहरे झळकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.
मयुरी देशमुख ‘मराठी बिग बॉस-2’ मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. याविषयी मयुरीने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नसली तरीही तिला बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं समजतंय.
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मयुरीने साकारालेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती. त्यामुळे बिग बॉस शोमध्ये तिचा निराळा अंदाज पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनाही नक्कीच उत्सुकता असणार.