‘शुभमंगल ऑनलाइन’; अशी असेल कथा

‘शुभमंगल ऑनलाइन’च्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे”, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेनं त्याने निर्मित केलेल्या पहिल्यावहिल्या मालिकेचं वर्णन केलं. ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे सुबोधची ही मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत आहे.
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा सुबोध आता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण ही भूमिका पडद्यामागची आहे. या मालिकेची हलकीफुलकी कथा प्रेक्षकांना ताण देणार नाही, असा विश्वास सुबोधनं व्यक्त केला आहे.
पडद्यामागे काम करण्याबाबत तो म्हणतो, “फक्त पडद्यासमोरच काम करण्याचा माझा हट्ट नाही. मला पडद्यामागेही काम करायला खूप आवडतं. नाटकातही मी पडद्यामागे काम केलंय. त्यामुळे पडद्यामागे काम करण्यांची मेहनत मला माहीत आहे.” सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली होती. मात्र आता त्यांची तब्येत सुधारत आहे. लवकरच क्वारंटाइनमधून बाहेर येणार असल्याचं सुबोधने यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:-