मृण्मयी कोणाला म्हणते आहे ‘मिस यू मिस्टर’ ?

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे लवकरच एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटामध्ये मृण्मयी आणि सिद्धार्थ मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहेत.
समीर जोशी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून त्याची कथा नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ, मृण्मयीव्यतिरिक्त राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर ही दिग्गज कलाकारमंडळीही स्क्रीन शेअर करणार आहेत.