मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवीन व्हिलन

चित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हढाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. परंतु नायकाच्या भूमिकेला उठाव देण्यासाठी खलनायकही तोडीस तोड असावा लागतो. अनेक मराठी चित्रपट खलनायकांमुळे लक्षात राहतात. खलनायकाचा भयंकर आणि क्रूर असा पूर्वीचा चेहरा आता राहिलेला नसून, संयत व्यक्‍ती खलनायकाच्या भूमिकांमध्ये दाखविल्या जात आहेत. अशा प्रकारचा खलनायक साकारण्यासाठी ताकदीच्या अभिनेत्यांची गरज असते.

प्रसाद सुर्वे हा कलाकार त्याच्या आगामी “फाइट” या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याच्या अभिनयाच्या ताकदीमुळे चित्रपटातील नायकाची गुणवत्ता प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल.तो एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

प्रसाद याने या अगोदर नाटक, चित्रपट, मालिका या तीनही माध्यमांतून प्रेक्षकांना सामोर झळकला आहे. आगामी फाइट चित्रपटासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. आगामी काळात त्याचा हातात अनेक प्रोजेक्ट असून त्यात ही तो खलनायक साकारणार आहे असे त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या –