मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘जंगली’ सिनेमातून पूजा हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘जंगली’ चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. मात्र त्यात पूजाची झलक न दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लूकबाबत उत्सुकता आहे.

५ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २०१० मध्ये पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर पोष्टर बॉईज, नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. पूजाच्या रुपाने आणखी एक नाव हिंदी पडदा व्यापून टाकण्यास सज्ज झालं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like