पहिल्यांदाच मिशी कापली, फक्त बाळासाहेबांसाठी – प्रविण तरडे

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सह मराठी अभिनेता प्रविण तरडेंनी देखील कामगार नेते दत्ताजी साळवी यांची महत्वाची भूमिका वठविली असून त्यांनी या चित्रपटाविषयीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.विशेष म्हणजे केवळ या चित्रपटासाठी मिशा कापल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘ठाकरे’ चित्रपटामध्ये दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेला न्याय देताना त्यांच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी आत्मसात करणं गरजेचं होतं. त्यामुळे दत्ताजी यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी प्रविण यांना मिशी कापणं गरजेचं होतं. ही भूमिका योग्यरित्या पार पाडावी यासाठी प्रविण यांनी पहिल्यांदाच त्यांची मिशी कापली. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बाळासाहेबांसाठी पहिल्यांदाच मिशी कापल्याचं त्यांनी म्हटलं.

प्रविण यांनी फेसबुकवर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोपैकी एक फोटो सेटवरचा आहे. या फोटोला कॅप्शन देत प्रविण यांनी ”ठाकरे’ .. कामगार नेते दत्ता साळवी .. पहिल्यांदाच मिशी कापली होती फक्त बाळासाहेबांसाठी’ ..असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like