मराठी अभिनेते दिनेश साळवी यांचे निधन

मराठी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते दिनेश साळवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बुधवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकात त्यांना छातीत अचानक दुखू लागले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 53 वर्षांचे होते

साळवींनी सीआयडी मालिकेत काम केलं होतं. अनेक मालिकांमध्ये ते छोट्या भूमिका करायचे. काॅलेजमध्ये एकांकिका बसवण्याचं काम त्यांना आवडायचं. म्हणून काॅलेज तरुण-तरुणींत ते लोकप्रिय होते. कामगार कल्याणची अनेक नाटकं त्यांनी बसवली होती आणि त्यात भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांच्या निधनानं सिनेमा, नाट्य आणि मालिका इथल्या कलाकारांना धक्का बसलाय.

महत्वाच्या बातम्या –