‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा खिताब मिळवणारी मानुषी अखेर हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानुषी येत्या काळात एका बायोपिकमधून रुपेरी पडद्यावर दणक्यात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मानुषी  अक्षय कुमार याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षय कुमारसोबत पदार्पणाच्याच चित्रपटात झळकण्याची संधी मिळाल्याच मानुषीसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

You might also like