‘मेंटल है क्या’ आता या नावानं होणार प्रदर्शित

सीबीएफसी द्वारे ‘मेंटल है क्या’ या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर या सिनेमाचं नाव बदलून ‘जजमेंटल है क्या’ असं केलंय. राजकुमार राव आणि कंगना रानौत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतरपासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांसाठी वादात अडकलाय.

या सिनेमाच्या नावावरही अनेकांनी टीका केली होती. यावर सीबीएफसीनं हा आक्षेप ग्राह्य धरत सिनेमाचं नाव बदलण्याची सूचना केली होती. त्यानंतर निर्मात्यांनी हा निर्णय घेतला.  ‘जजमेंटल है क्या’ हा सिनेमा कुणाच्याही भावना दुखावणार नाही, उलट या सिनेमात मानसिक रुपात आजारी असणाऱ्यांबद्दल पूर्ण संवेदनशीलता व्यक्त करण्यात आली असल्याचं निर्माता एकता कपूर हिनं म्हटलंय.