‘मणिकर्णिका’च्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका

कंगना रानौतचा ‘मणिकर्णिका’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाअगोदरच सर्वात दुःखद अशी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कमल यांची प्रकृती गंभीर अशून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही माहिती देण्यात आली आहे.

हा चित्रपट झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच त्याला करणी सेनेकडून विरोध होत आहे. करणी सेनेला कंगनाने जशास तसं उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like