पायरसीने रोखली ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चित्रपटाची वाट….!

कंगना रानौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. कंगणाच्या या चित्रपटाला  प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. परंतु तमिळ रॉकर्स या वेबसाईटने चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एक दिवसाच्या आतच संपूर्ण  चित्रपटाच ऑनलाईन लीक केली आहे.

चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे पहिल्या दिवसानंतर चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यामुळे याचा मोठा फटका निर्मात्यांना बसत आहे.

‘तमिलरॉकर्स’ हा चित्रपट ऑनलाईन लीक केले होते. TamilRockers.com ही पायरसी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर अनेक भाषेतील चित्रपट लीक केले जातात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पोलिसांनी Tamilrockers वेबसाईट चालवणाऱ्या काही लोकांना अटक केली होती. मात्र या कारवाईनंतरही वेबसाईटवर अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट लीक होण्याचे सत्र सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like