‘मणिकर्णिका’ने तीन दिवसांत कमावले इतके कोटी…!

कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धूम केली असून रिलीजनंतरच्या तीनचं दिवसांत ४२. ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ८.७५ कोटी रूपये कमावले. यानंतर दुस-याचं दिवशी थेट १८.१० कोटींवर झेप घेतली. काल रविवारी हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आणि या चित्रपटाने १५.७० कोटींची कमाई केली. कमाईचा एकूण आकडा ४२.५५ कोटीच्या घरात आहे. याच बरोबर कंगनाचा हा चित्रपट या नव्या वर्षांत पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.  हा चित्रपट पुढील काही दिवसामध्ये आणखी कमाई करु शकतो असे जाणकारांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like