मल्लिकाने शेअर केला आपल्या चाहत्यांचा एक खास व्हिडिओ

आपल्या कातिल अदांसाठी प्रसिद्ध असलेली मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मल्लिका सध्या सिनेसृष्टीत फारशी सक्रिय नाही. मात्र तरीही तिच्या लोकप्रियतेत जराही कमतरता आलेली नाही.

मल्लिकाची लोकप्रियता दाखवणारा  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मल्लिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती गाडीतून प्रवास करत असताना तिची गाडी थांबलीआणि मल्लिकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. “तुमच्याकडून मिळणारं हे प्रेम पाहून मी भावूक झाले”, अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

२००२ साली ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘ख्वाहिश’, ‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट’, ‘गुरु’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने काम केलं. दरम्यान ‘मर्डर’ या चित्रपटामुळे तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात तिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत केलेले इंडिमेट सीन तुफान चर्चेत होते.

You might also like