समोर येणार चांगुलपणाच्या मुखवट्याआड लपलेला विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा…

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मधील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची वय विसरायला लावणारी ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मालिकेत नुकताच विक्रांत आणि इशाचा विवाहसोहळा पार पडला. पण येत्या काही दिवसांत मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

नुकताच झी मराठीने मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत येणाऱ्या नव्या वळणाची झलक पाहायला मिळत आहे. विक्रांतच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. कारण चांगुलपणाच्या मुखवट्याआड लपलेल्या विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

इशासोबत लग्न का केलं यामागचं खरं कारण विक्रांत सांगणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता हे कथानक पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like