२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक रिलीज

हिंदी आणि तेलगू भाषेत “मेजरचे” फर्स्ट लूक पोस्टर्स प्रसिद्ध झाले आहेत. पोस्टरवर  आदिवी मेजर उन्नीकृष्णन लूकमध्ये दिसले आहेत. मेजर पुढील वर्षी उन्हाळ्यात रिलीज होणार आहे. मेजर याचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करीत आहेत.

देशाला हादरवणार्‍या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बायोपिक मेजरचा पहिला लूक प्रसिद्ध झाला आहे. हिंदी आणि तेलगू चित्रपटात आदिवी शेष यांनी मेजर उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली आहे. आदिवीने पहिला लुक आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

एका संभाषणात चित्रपटाचे दिग्दर्शक शशी किरण म्हणाले- “जेव्हा ही घटना घडली तेव्हा आपल्यातील कोणीच नव्हते.” त्यावेळी सर्व गोष्टी बातम्यांमधून दर्शविले गेले हे आपल्या सर्वांना माहित आहे. सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपल्या कल्पनेतून आपण काय दर्शवितो त्यातील वास्तवाचे रंग भरणे. डॉक्युमेंटरी फिल्मऐवजी फीचर फिल्म म्हणून दाखविणे अधिक आव्हानात्मक आहे.

यापूर्वी 16 डिसेंबर रोजी आदिवीने एक पोस्टर शेअर करुन फर्स्ट लूकच्या रिलीजविषयी माहिती दिली होती. या पोस्टरवर त्या पात्राची दुसरी बाजू दर्शविली गेली होती.

 

You might also like