……म्हणून दोन्ही शनाया आल्या आमने-सामने

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनाया हे पात्र घराघरामध्ये पोहोचले. सुरुवातील शनायाची भूमिका अभिनेत्री रसिका सुनिलने निभावली होती. परंतु काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागली. त्यानंतर आता शनायाच्या भूमिकेत ईशा केसकर पाहायला मिळते.
नुकताच ईशा आणि रसिका यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा फोटो पाहून दोन्ही शनाया एकत्र येऊन गॅरी उर्फ गुरुनाथ सुभेदारला धडा शिकवणार का? की त्या दोघी एकत्र दुसऱ्या एका मालिकेत झळकणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.