संजय जाधवच्या ‘लकी’ चित्रपटाचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे प्रदर्शित…..

काही दिवस पूर्वी संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते आता या चित्रपटाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे प्रदर्शित झाले आहे.चैतन्य देवढे लाही संजय जाधव ह्यांनी लकी चित्रपटातून लाँच केले आहे.  सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे.गीतकार सचिन पाठकच्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन ह्यांनी संगीत दिले आहे. आणि चैतन्य देवढेने ह्याला स्वरसाज चढवला आहे.

चैतन्य देवढे म्हणतो, “मी स्वत:ला खूप लकी समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन ह्यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.” हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like