महेश बाबूच्या ‘महर्षि’चा ट्रेलर प्रदर्शित

महेश बाबू ‘महर्षि’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपट महेश बाबू एक कॉलेज विद्यार्थी ‘ऋषी’ च्या लुकमध्ये दिसत आहेत.
या ट्रेलरमध्ये शानदार सुटबूटात आणि एका सुंदर लोकेशनवर हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना महेश बाबू दिसत आहेत. तसेच त्याच्या भरदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. याशिवाय महेश बाबूने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे.
भारताचे एनन नेनु या चित्रपटात मुख्यमंत्री म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर अभिनय क्षेत्रात ‘महर्षि’मध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून दिसणार आहेत. जो कधीही पराभूत झालेला नाही. हा चित्रपट ९ मे २०१९ रोजी रिलीज होणार आहे.