लवकरच तुमच्या भेटला येणार ‘दे धक्का’चा सिक्वल

महेश मांजरेकर लवकरच ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव  ‘दे धक्का २’ असे आहे. महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दे धक्का २’ चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

या पोस्टरमध्ये शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव लंडनच्या रस्त्यावर बंद पडलेल्या कारमध्ये बसलेले पाहायला मिळतायेत. मात्र बाकी कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टर वरून चित्रपटाचे महत्त्वाचे कनेक्शन लंडनशी असणार हे कळते आहे. तसेच हा चित्रपट ३ जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘दे धक्का २’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत. तसेच चित्रपटाची निर्मिती यतिन जाधव आणि स्वाती खोपकर करणार आहेत.

View this post on Instagram

दे धक्का २ 03 Jan 2020

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on