महेश मांजरेकरांचा ‘हा’ ठरतोय चर्चेचा विषय

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात कोणते कलाकार असणार याची चर्चा रंगत असतानाच या पर्वाचं सूत्रसंचालन करणारे महेश मांजरेकर यांचा ‘रॅपचीक रॅपर लूक’ आता चर्चेचा आला आहे. मांजरेकरांनी या रिअॅलिटी शोसाठी रॅप साँगही शूट केलंय जे त्यांनी स्वतः गायलं आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागाच्या प्रोमोसाठी महेश मांजरेकरांनी चार वेगवेगळ्या लूकमध्ये शूटींग केलं आहे. प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यातल्याच एका प्रोमोत मांजरेकरांचं रॅप साँग असेल.

You might also like